शिस्तबद्ध पक्ष अशी ओळख सांगणाऱ्या भाजपा ला उत्तर प्रदेशात घरचा आहेर मिळाला आहे. कानपूर महानगरपालिकेतील एका समितीच्या अध्यक्षपदी उमेदवारी न मिळाल्याने खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांच्या सुनबाई दीपा कोविंद यांनी भाजपा विरोधात बंड पुकारले आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांनी भाजपा च्या अधिकृत उमेदवाराला आव्हान दिले आहे. दीपा ह्या रामनाथ कोविंद यांचे पुतणे पंकज यांच्या सौ. आहेत. पक्षाने सरोजिनी देवी ह्यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या निर्णयाबद्दल पंकज कोविंद यांनी नाराजी व्यक्त केली. पक्षाचा निर्णय आम्हाला पटलेला नाही. आम्ही पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. पक्षाने उमेदवारी दिलेल्या कोरी यांना कोणीही ओळखत नाही. स्थानिक जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेवून आम्ही अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews